Saturday, April 27, 2024
Homeनगरखैरी निमगाव परिसरात बस व कारचा अपघात

खैरी निमगाव परिसरात बस व कारचा अपघात

खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgav

एस टी महामंडळाची (ST Corporation) श्रीरामपूर आगाराची प्रवासी बस आणी वेन्टो कार यांच्यात अपघात (Bus and Car Accident) होऊन दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात (Accident) कोणीही जखमी झाले नाही. श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur Taluka) खैरी निमगाव (Khairi Nimgav) येथील तिनचारी जवळ हा अपघात (Accident) झाला.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur Taluka) खैरी निमगाव येथील तिनचारी जवळ श्रीरामपूरहून वैजापूरकडे जाणारी श्रीरामपूर डेपोची एमएच 14 बीटी 2241 ही बस आणी श्रीरामपूरच्या दिशेने जाणारी वेन्टोकार एमएच 17 बीव्ही 3310 यांच्यात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात एकही जण जखमी (Injured) झाला नाही. श्रीरामपूरहून येणार्‍या वैजापूर बसचे चालक अहमद शहा शब्बीर शहा हे होते तर वेन्टोकार चालक देवळाली प्रवराचे आसाराम रंगनाथ ढुस हे होते. अपघातात बस व वेन्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

खैरी निमगाव येथील तिनचारी परिसरात यापुर्वी अनेक अपघात झालेले आहेत. या ठिकाणी गतीरोधक बसविण्याची आवश्यकता आहे. यापुर्वी येथे गतीरोधक होते मात्र ते काढून टाकण्यात आले आहे. तसेच श्रीरामपूर-पुणतांबा (Shrirampur-Puntamba) रस्ता वळणाचा असल्याने येथे दिशादर्शक फलक आहेत मात्र ते अनेक ठिकाणी झाडांमुळे दिसत नाहीत. याबाबत बाधंकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, घटनेची माहीती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार मोहन शिंदे आणी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी वारे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या