Tuesday, April 23, 2024
Homeनगरखडांबे बुद्रुकमध्ये दोन सख्ख्या भावांत हाणामारी

खडांबे बुद्रुकमध्ये दोन सख्ख्या भावांत हाणामारी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथील कल्हापुरे बंधूंमध्ये विहिरीच्या सामाईक पाण्याने पिकाला पाणी देण्यासंदर्भात वाद होऊन राहुरी तलाठी कार्यालयातील कर्मचारी भागवत केरु कल्हापुरे यांना त्यांचे सख्खे बंधू प्रकाश केरू कल्हापुरे व कानिफनाथ केरू कल्हापुरे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबत भागवत केरू कल्हापुरे यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रकाश केरू कल्हापुरे व कानिफनाथ केरु कल्हापुरे यांनी त्यांच्या खडांबे शिवारातील गटनंबर 166/2 येथील सामाईक बांधावरील शेताला विहिरीचे पाणी देत असताना तू येथे पुन्हा पाणी भरण्यासाठी आल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, असे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या