Thursday, April 25, 2024
Homeनगरखडका फाट्यानजिक गॅस पाईपलाईनवर कार धडकली; एक ठार

खडका फाट्यानजिक गॅस पाईपलाईनवर कार धडकली; एक ठार

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नगर -औरंगाबाद महामार्गावर खडका फाट्यानजीक पतंजली कंपनीसमोर महामार्गालगत सुरू असलेल्या गॅस पाईप लाईनच्या पाईपवर कार धडकून अपघातात एक जण ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिखली येथून दुपारी 4 वाजेच्या सुमारास पनवेल येथे जाण्यासाठी सिडको मुंबई (बेलापूर) चे अभियंते राजकुमार नारायण बडवे (वय 54) व त्यांच्यासोबत अरुण सोपानराव जाधव, कमलाकर शेषराव कांबळे हे निघाले होते. खडका फाट्यानजीक पतंजली कंपनीच्या नजीक आले असता गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या गॅस पाईपलाईनच्या पाईपवर त्यांची गाडी धडकली.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे, कॉन्स्टेबल अशोक कुदळे, केवल राजपूत, जयवंत तोडमल हे घटनास्थळी हजर झाले. जखमींना उपचारासाठी नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता गंभीर जखमी राजकुमार बडवे यांना मयत घोषित करण्यात आले. अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. मयत बडवे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात 86/2021 सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक जयवंत तोडमल करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या