Tuesday, April 23, 2024
Homeजळगावकेटामाईन प्रकरणातील संशयितांनी देश सोडण्यास मनाई

केटामाईन प्रकरणातील संशयितांनी देश सोडण्यास मनाई

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

एमआयडीसी परिसरातील रूखमा इंडस्ट्रिज Rukhma Industries आणि बायोसिन्थॅटिक कंपनीत Biosynthetic Company आठ वर्षांपुर्वी 14 डिसेंबर 2013 रोजी डीआरआय (डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्स ) Directorate of Revenue Intelligence च्या मुंबई विभागातील अधिकार्‍यांनी छापा टाकून सुमारे 118 कोटी रूपये किंमतीचे केटामाईन Ketamine या अंमलीपदार्थाचा साठा Stockpile of drugs जप्त केला होता. कंपनी मालक चिंचोले काका-पुतण्यासह Chinchole uncle-nephew 12 संशयीतांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान शिक्षा ठोठावण्यात आलेल्या 5 संशयीतांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने Aurangabad Bench प्रत्येकी 1 लाखांच्या जात मुचलक्यावर अटीशर्थींसह जामीन मंजूर Bail granted केला आहे.

- Advertisement -

केटामाईन प्रकरणातील बारा संशयीत चौकशीत वरूण कुमार तिवारी, गौरी प्रसाद पाल (दोन्ही रा. विकरोली मुंबई), नित्यानंद थेवर (वय 27 रा. धारावी मुंबई), वाहन चालक कांतीलाल उत्तम सोनवणे (रा. जळगाव), श्रीनिवास राव, विकास पुरी (रा. पवई मुंबई), खेमा मधुकर झोपे (रा. अंबरनाथ ठाणे), विकास रामकृष्ण चिंचोले (रा. जळगाव), नितीन चिंचोले (रा. आदर्श नगर), रजनिश ठाकूर(सिकंदराबाद), एस.एम.सेन्थीलकुमार (मैलापूर, चेन्नई) आणि विशाल सोमनाथ पुरी (रा. जनकपुरी नवी मुंबई अशा 12 संशयितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होवुन त्यांना अटक झाली होती.

जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे शिक्षा

रूखमा इंडस्ट्रिजमध्ये केटामाईन सापडल्यानंतर आरोपींच्या घरी तपासणी करण्यात आली. त्यात आरोपी विकास चिंचोले यांच्या घरात 362 ग्रॅम सोने, अडीच कोटीची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. सोबत केटामाईन प्रकरणात मास्टरमाइंड मुख्य आरोपी विकास पुरी याची बायोसिन्थॅटिक कंपनीतील मशिनरी, सर्व सामान, तसेच रूखमा इंडस्ट्रिज मधील संपुर्ण मशिनरी आणि वापरण्यात आलेल्या तीन महागड्या चार चाकी गाड्या गुन्ह्यात सिझ करण्यात आल्या होत्या त्या सरकार जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. डीआरआयतर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड.अतुल जाधव आणि अ‍ॅड. अतुल एस. सरपांडे, (मुंबई उच्च न्यायालय, मुंबई) यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने सातही संशयीतांवर दोषारोप सिद्ध झाल्याने शिक्षा सुनावली तर 5 संशयीतांची भक्कम पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली होती.

प्रत्येकी 1 लाखांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन

गुन्ह्यातील रजनीशकुमार ठाकूर, श्रीनिवास राव, नितीन चिंचोले, एस.एम.सैंथिलकुमार, वरूणकुमार तिवारी अशा 5 शिक्षा झालेल्या आरेापींतर्फे औरंगाबाद खंडपीठात जामिन अर्ज दाखल केला होता. संशयीतांतर्फे अ‍ॅड.अभयसिंह भोसले, अ‍ॅड.रवी गुरुनानी, अ‍ॅड.चिरमाडे यांनी युक्तिवाद करतांना आरोपींनी न्यायालयाने सुनावल्या शिक्षेपैकी निम्मे शिक्षा (8 वर्ष शिक्षा) भोगलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देषा नुसार एनडीपीएस क्टच्या अशा प्रकारच्या गुन्ह्यात बंदिवान कैद्याने निम्मी शिक्षा भोगलेली असल्यास तो, जामीनास पात्र होतो असा दाखला दिला. तसेच गुन्ह्यात रुखमा इंडस्ट्रीजमध्ये सापडलेले केटामाईन हे पूर्णतः शुद्ध केटामाईन नव्हे तर कच्चा माल असल्याचे अ‍ॅड.भोसले यांनी बाजू मांडताना सांगितले. न्यायालयाने 5 जणांना प्रत्येकी 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून दोन महिन्यातून एकदा जिल्हा न्यायालयात हजेरी लावणे आणि देश सोडून न जाण्याचे आदेश दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या