Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात शिक्षणाचा केरळ पॅटर्न

राज्यात शिक्षणाचा केरळ पॅटर्न

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यात शिक्षणाचा केरळ पॅटर्न (Kerala pattern of education) राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत इयत्ता तिसरीपासून पुढील इयत्तेसाठी परीक्षा घेतल्या जातील. परीक्षा जरी घेतल्या जाणार असल्या तरी कोणात्याही विद्यार्थ्याला आठवीपर्यंत नापास केले जाणार नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar)यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. येत्या काही वर्षात महाराष्ट्रात मातृभाषेतून शिक्षण दिले जाणार असल्याने भविष्यात इंग्रजी शाळांकडील गर्दी थांबेल, असा दावाही त्यांनी केला.

- Advertisement -

अन्य राज्यांच्या तुलनेने केरळने शिक्षण क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. तेथील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी माझ्यासह शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी केरळचा नुकताच दौरा केला होता. तेथील शिक्षण धोरणामुळे झालेली आमूलाग्र सुधारणा लक्षात घेऊन आपल्या राज्यात शिक्षणाचा केरळ पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. केरळने शिक्षण विभागात अनेक प्रयोग केले आहेत.

तेथील सरकारने शाळा चालविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे दिली आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे, असेही केसरकर म्हणाले. मराठी भाषा विभाग लवकरच जागतिक मराठी परिषदेचे आयोजन करणार आहे. मुंबईत ही परिषद होणार असून त्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाची मदत घेतली जाणार आहे. या माध्यमातून मराठी भाषा बोलणार्‍या राज्यातील लोकांना एकत्र आणण्याचा आणि संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न असेल. तसेच मुंबईत मराठी पंधरवडा मोहीम राबविणार आहोत. ’मुंबईत मराठी बोला’ अशी 15 दिवसाची मोहीम असेल, अशी माहितीही केसरकर यांनी दिली.

पुस्तकाला वहीची पाने

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी आम्ही पुस्तकाला वहीची पाने जोडणार आहोत. पुढील वर्षीपासून पुस्तक आणि त्याला वह्यांची पाने जोडली जातील. प्रत्येक पुस्तक तीन भागात विभागले जाईल. म्हणजे तीन महिन्याला पुस्तक बदलावे लागेल. याच विभागलेल्या पुस्तकाला वह्यांची पाने असतील. त्यामुळे विद्यार्थीसुद्धा झालेला अभ्यास त्याच वह्यांच्या पानावर लिहितील, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या