Friday, April 26, 2024
Homeनगरकेलवडची लाचखोर महिला तलाठी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

केलवडची लाचखोर महिला तलाठी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

राहाता | Rahata

शेतजमिनीचे वाटणी पत्र व हक्क सोड पत्राच्या आधारे नोंदी घेऊन फेरफार देण्याकरिता 6 हजार रूपयांची लाच घेताना

- Advertisement -

महिला तलाठी स्वाती गौतम मेश्राम यांना लाच घेताना लाच प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले.

तक्रारदार यांनी त्यांचे खडकेवाके हद्दीतील वडिलांचे व चुलत्यांचे नावे असलेल्या शेतजमीनीचे वाटणी पत्र व हक्क सोड पत्राच्या आधारे नोंदी घेऊन फेरफार देणे करिता यातील तलाठी स्वाती गौतम मेश्राम, यांनी तक्रारदार यांच्याकडे 7000 रूपयांची मागणी केली. त्यानंतर आरोपी स्वाती हिने पंचासमक्ष 7 हजारांची मागणी करुन तडजोडीअंती 6000 लाचेची मागणी केली.

यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे सापळा रचला. त्यात तक्रारदार यांच्याकडुन पंचा समक्ष, राहाता तालुक्यातील केलवड तलाठी कार्यालय येथे लाच स्विकारली असता रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पो. हवालदार तन्वीर शेख, पोना प्रशांत जाधव. पोना.चौधरी, विजय गंगुल, पो. शि. रवींद्र निमसे, वैभव पांढरे, चालक पो ह. हरुन शेख यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या