Thursday, April 25, 2024
Homeजळगावकेकी मूस यांच्या कलाकृती आता एका क्लिकवर

केकी मूस यांच्या कलाकृती आता एका क्लिकवर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

चाळीसगाव येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत कलामहर्षी केकी मूस ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेची अधिकृत वेबसाईटाचे लोकार्पण त्यांच्या पुण्यतिथीदिनी ३१ डिसेंबर २०२० रोजी चाळीगाव येथून खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते तर जळगाव येथून जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत ह्यांच्या हस्ते कळ दाबून मोठ्या उत्सहाता संपन्न झाले.

- Advertisement -

नवीन वेबसाईटमुळे आता केकी मूस यांच्या कलाकृती विषयी सखोल माहिती एक क्लिकवर संपूर्ण जगाला मिळणार आहे. त्यामुळे अजुन चाळीसगावच्या लौकीकात भर पडणार आहे.

या संकेतस्थळावरून संस्थेची आणि संस्थेच्या कार्याची संपूर्ण जगाला ओळख होणार आहे. संकेतस्थळ अनंत सामंत (मुंबई) ह्यांनी संस्थेसाठी विकसित केले आहे. ह्या संकेत स्थळावरून संस्थेची इत्यंभूत माहिती लोकांना मिळणार आहे. तसेच केकी मूस ह्यांच्याबाबत व त्यांच्या कलाकृतीं विषयी सर्व माहिती दर्शकांना मिळणार आहे.

जास्तीत जास्त नागरीकांनी संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन संस्थेच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे. येथील कार्यक्रमात खासदार उन्मेष पाटील यांच्या कार्यालयात संस्थेच्यावतीने अध्यक्ष भि. अ. गायकवाड, सचिव कमलाकर सामंत, वेबसाईट निर्माते अनंत सामंत, भिकन वाणी, ग्रंथपाल मनोज घाटे आदी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयात संस्थेच्यावतीने विश्वस्त आणि संग्रहालय तज्ञ भुजंगराव बोबडे, मार्गदर्शक सुरेश पांडे, सुजीत वर्मा आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या