Thursday, April 25, 2024
Homeजळगावविद्यापीठाकडून पदवी प्रथम प्रवेशास 11 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

विद्यापीठाकडून पदवी प्रथम प्रवेशास 11 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने इयत्ता बारावी वर्गाच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशास 11 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

- Advertisement -

12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, तसचे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे.

शासनस्तरावरील व केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील अभ्यासक्रम वगुळून विद्यापीठाने मान्यता दिलेल्या प्रवेश क्षमतेच्या अधिन राहून महाराष्ट्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्श तत्वांच्या आणि विद्यापीठाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांच्या अधिन राहून दि.11 जानेवारी,2021 पर्यंत पुढील अभ्यासक्रमांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

यामध्ये प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान व बी.एस.डब्ल्यु., बी.व्होक., बी.एफ.ए., बी.सी.ए., बी.बी.ए., बी.एम.एस., बी.एम.एस. (ई-कॉमर्स), एम.सी.ए. (इंटिग्रेटेड), एम.बी.ए. (इंटिग्रेटेड), डी.सी.एम., डी.सी.ए., डी.एम.ई. अ‍ॅड आयएम., बी.पी.ई. व मान्यताप्राप्त पदवी/पदवीकास्तरावरील अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

महाविद्यालयांनी सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता व विविध शुल्क आणि आवश्यक कागदपत्रांच्या फाईल दि.18 जानेवारी 2021 पर्यंत विद्यापीठास सादर कराव्यात असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या