Thursday, April 25, 2024
Homeनाशिककवी कट्टा, गझल कट्टा अखेर बंदीस्त सभागृहातच

कवी कट्टा, गझल कट्टा अखेर बंदीस्त सभागृहातच

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 94th Marathi Literary Convention इतिहासात प्रथमच होत असलेल्या बाल साहित्य कट्टयासह कवी व गझल कट्ट्याला Kavi Katta, Ghazal Katta अखेर बदलत्या हवामानापुढे हार मानावी लागली असून खुल्या मोकळ्या वातावरणात हे तीन कट्टे घेण्याचा मोह सोडून ते बंदीस्त सभागृहात घेण्यावर आता एकमत झाले आहे.

- Advertisement -

यंदाच्या साहित्य संमेलनावर सुरवातीला करोनाचे व नंतर पावसाचे सावट निर्माण झालेे. समेलनाच्या दोन दिवस अगोदर पाऊस व थंंडीने जिल्हा गारठला आहे. त्यात समेलन आडगावसारख्या बागायती शेतीच्या भागात होत आहे. उन, वारा, पाऊस या सर्वापासून रक्षण होईल अशी व्यवस्था साहित्य संमेलनात केली जात असली तरी पावसाची शक्यता लक्षात घेेऊन वॉटरप्रुफ मंडप उभारले असले तरी थंडीपासून बचाव स्वतालाच करावा लागणार आहे.

साहित्य संंमेलन दोन दिवसावर असतांना ढगाळ वातावरण तयार झाले आाहे.तसेच सकाळपासून पावसाला सुरवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाच्या तयारीकडे पाहिले जात असतांंना गझल कट्टा, बाल साहित्य कट्टा जरी उपमंडपात होणार असला तरी बिघडलेल्या वातावरणामुळे ते बंदीस्त हॉॅलमध्ये घेणे सोयीचे होणार आहे.

मात्र ज्या मोठ्या संख्येने हे कट्टे होणार होते ते मोठ्या हॉलमध्ये करायचे ठरवले तरी शे- दिडशेच्यावर उपस्थितीतच होऊ शकणार आहे. व्यवस्था करण्यासाठी पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. हे संमेलन निर्वीघ्न पार पडावे यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. सर्व प्रकारच्या धोक्यांंचा विचार करुन आव़श्यक त्या उपाय योजना करण्यावर भर आहे.कवी कट्टा आता कोणत्या हॉलमध्ये घ्यावा याचे नियोजन आज दिवसभर करण्यात येत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या