Friday, April 26, 2024
Homeजळगावगोंधळामुळे विद्यापीठाच्या सिनेटची ऑनलाईन सभा स्थगित

गोंधळामुळे विद्यापीठाच्या सिनेटची ऑनलाईन सभा स्थगित

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची अधिसभेची ऑनलाईन सभा प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती.

- Advertisement -

सभा सुरु होताच काही सिनेट सदस्यांनी सभेचे कामकाज ऑफलाईन घ्यावी अशी मागणी करुन गोंधळ घातला.त्यामुळे सभा स्थगित करण्यात आली.

सभेची सुरुवात राष्ट्रगीताने होऊन शोकसंदेशांवर चर्चा करून सभेचे कामकाज सुरु असतांना अधिसभेतील काही मोजक्या सभासदांनी अधिसभेचे कामकाज ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घेण्यात यावे असा आग्रह धरला.

प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना बाधित झाल्याने त्यांना सभेत उपस्थित होण्यास दहा ते पंधरा मिनिटे उशिर झाला. त्या बद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करुन कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार अधिसभेचे कामकाज ऑनलाईन घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र अधिसभेतील मोजक्या सदस्यांनी अधिसभेचे कामकाज ऑफलाईन घेण्याचा आग्रह केला. त्यांचा आग्रह विचारात घेऊन अधिसभेचे कामकाज कुलगुरुंनी तुर्त स्थगित केले.

विद्यापीठाने ऑफलाईन अधिसभा दि.30 मार्च रोजी आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे विनंती अर्ज दिला असून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे प्रभारी कुलसचिव डॉ.शामकांत भादलीकर यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या