Monday, April 29, 2024
Homeनगरकौठा येथे भरदिवसा बिबट्याने पाडला तीन शेळ्यांचा फडशा

कौठा येथे भरदिवसा बिबट्याने पाडला तीन शेळ्यांचा फडशा

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) कौठा-चांदा (Kautha-chanda) परिसरात बिबट्याचा (Leopard) धुमाकूळ वाढला असून काल भरदिवसा एकाच शेतकर्‍याच्या तीन शेळ्यांचा फडशा बिबट्याने (Leopard) पाडल्याने परीसरात खळबळ उडाली आहे .

- Advertisement -

कौठा (Kautha) येथील मुळा उजव्या कालव्यालगत (Mula Right Canal) 45नाला शिवारात गट नंबर 148 मध्ये अक्षय ब्रम्हदेव मरकड यांची वस्ती आहे.

मंगळवारी सांयकाळी पाच वाजेच्या दरम्यान अक्षय हा जनावरांना वाढे आणण्यासाठी गेला होता. याच दरम्यान बिबट्याने (Leopard) वस्तीवरील शेळ्यांवर ह्ल्ला (Attack the Goats) केला. त्यात दोन गाभण आणि एक दुध (Milk) देणारी शेळी (Goats) अशा तीन शेळ्यांचा फडशा पाडला. सहा वाजेदरम्यान अक्षय वस्तीवर आला असता त्याने झालेला प्रकार पाहिला. आजुबाजूला शोध घेतला असता बिबट्याच्या (Leopard) पायाचे ठसे निदर्शनास आले.

सकाळी नेवासा (Newasa) वनपरिमंडल अधिकारी एम. आय. सय्यद यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार श्री. सय्यद यांनी तातडीने वनविभागाचे डी. टी. गाडे यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. मात्र एकाच शेतकर्‍याच्या तब्बल तीन शेळ्या बिबट्याने फस्त केल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात असून या परिसरात सततच बिबट्याचे दर्शन होत असल्याने त्याचा तातडीने बंदोबस्त करावा या भागात पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या