Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशकाश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; दहशतवाद्यांकडून २ भावांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; दहशतवाद्यांकडून २ भावांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

दिल्ली | Delhi

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात काश्मिरी पंडिताचा मृत्यू झाला आहे. शोपियन येथे सफरचंदाच्या बागेत दहशतवाद्यांकडून दोन भावांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका भावाचा मृत्यू झाला, तर एक जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

दहशतवाद्यांनी गोळीबार केलेले दोघेही काश्मीरी पंडित (Kashmiri Pandit) असून दोघेही सख्खे भाऊ आहे. सुनील कुमार भट्ट असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर पिंटू कुमार भट्ट असे जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे समजते. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या या गोळीबारानंतर स्थानिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या आठवडाभरात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी हल्ले वाढवले आहेत. रविवारी नोहट्टा येथे एका पोलीस कर्मचाऱ्याचा तर गेल्या आठवड्यात बांदीपोरा येथे एका स्थलांतरित मजुराचा मृत्यू झाला. बडगाम आणि श्रीनगर जिल्ह्यात सोमवारी दोन ग्रेनेड हल्ले झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या