Friday, April 26, 2024
Homeनाशिककसबे सुकेणा शहर बससेवेला हिरवा कंदील

कसबे सुकेणा शहर बससेवेला हिरवा कंदील

कसबे सुकेणे । वार्ताहर Kasbe Sukene

गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणारी नाशिक सीबीएस (Nashik CBS) कडून जाणारी कसबे सुकेणा शहर बस सेवेला (Kasbe Sukena city bus service) अखेर हिरवा कंदील मिळाला असून लवकरच सीबीएस व सिव्हील हॉस्पिटलच्या गेट समोरून ओझर (Ozer) मार्गे ओझर टाऊनशिप (Ozer Township) ते कसबे सुकेणे पर्यंत शहर बस सेवा (Bus service) सुरु होत असल्याची माहिती नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकांनी दिली आहे.

- Advertisement -

करोना (Corona) च्या दुसर्‍या लाटेपासून नाशिक ते कसबे सुकेणा बस सेवा बंद करण्यात आली होती. त्यातच एचएएल (HAL) प्रशासनाने त्यांच्या हद्दीतून बस सेवा सुरू करण्यास परवानगी देखील नाकारली होती. जिल्हाधिकार्‍यांच्या मध्यस्थीने एचएएल प्रशासनाने एचएएल मार्गे बस सेवा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी नाशिक महानगर परिवहन महामंडळ (Nashik Metropolitan Transport Corporation) मात्र बस सेवा सुरू करण्यास नाखूष होते.

तेव्हा प्रवासी संघटना व प्रवाशांनी वेळोवेळी निवेदन देऊन संबंधित अधिकार्‍यांच्या भेटी घेऊन लोकप्रतिनिधींवर दबाव आणून शेवटी आता नाशिक ते कसबे सुकेणा बस सेवेला सुरुवात होत आहे. या बस सेवेमुळे ओझर, ओझर टाऊनशिप, दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, भाऊसाहेबनगर आदी गावातील प्रवाशी, चाकरमानी वर्ग, विद्यार्थी व शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या