Friday, April 26, 2024
Homeधुळेशिरपूर तालुक्यातील करवंद धरण ओव्हर फ्लो

शिरपूर तालुक्यातील करवंद धरण ओव्हर फ्लो

धुळे Dhule। प्रतिनिधी

अरुणावती Arunavati नदीवरील करवंद धरण Karwand dam overflow पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. अशी माहिती पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता सचिन शिंदे Sachin Shinde Irrigation Sub-Division यांनी दिली आहे.

- Advertisement -

अनेर मध्यम प्रकल्पाचे सर्व दहा दरवाजे बंद करण्यात आले असून दैनंदिन पडणार्‍या पावसामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त विसर्ग जास्तीचे पाणी सांडव्याद्वारे वेळोवेळी अनेर नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे अनेर नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे अरुणावती, अनेरसह तापी नदी काठावरील गावातील ग्रामस्थांनी आवश्यक खबरदारी बाळगावी, नदीची पाणी पातळी वाढलेल्या कालावधीत, पूर परिस्थितीमध्ये नदी पात्रातून व नाल्यांमधून प्रवास करणे टाळावे.

सद्यस्थि:तीत मागील सात ते दहा दिवसांत शिरपूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे पाटबंधारे उपविभाग, शिरपूरच्या अखत्यारीमधील दोन लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकल्पांपैकी आज 2 सप्टेंबर 2021 रोजी पहाटे पाच वाजता करवंद मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून कोणत्याही क्षणी त्याच्या सांडव्यावरुन अरुणावती नदी पात्रात विसर्ग सुरू होईल.

त्यामुळे अरुणावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. तसेच अनेर मध्यम प्रकल्पाचे सर्व दहा दरवाजे जलसाठा करण्यासाठी बंद करण्यात आले असून दैनंदिन पडणार्‍या पावसानुसार धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त विसर्ग सांडव्याद्वारे वेळोवेळी अनेर नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे अनेर नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे.

पावसाळा कालावधी व पूर नियंत्रणाबाबत आवश्यक सूचना यापूर्वीच सर्व शासकीय संस्था, ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीमध्ये पावसाचे प्रमाण कमी- अधिक स्वरुपाचे असून त्यामुळे अरुणावती व अनेर नद्यांच्या पाणी पातळी मध्ये अचानक वाढ होणे होवू शकते. त्यामुळे होणारी जीवित हानी टाळण्यासाठी अरुणावती, अनेर व तापी नदी काठावरील गावांमधील ग्रामस्थांनी आवश्यक खबरदारी घ्यावी.

नदीची पाणी पातळी वाढलेल्या कालावधीत पूर परिस्थीतीमध्ये नदी पात्रातून व नाल्यांमधून प्रवास करणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या