Monday, April 29, 2024
Homeनगरकारवाडी फाटा रस्त्याचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

कारवाडी फाटा रस्त्याचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कारवाडी फाटा ते कारवाडी गावाअंतर्गत होत असलेल्या रस्त्याचे काम इस्टिमेंट प्रमाणे होत नसल्याने ग्रामस्थ महिलांनी एकत्र येत काम बंद पाडल्याने कोपरगाव तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.

- Advertisement -

जिल्हा वार्षिक योजना 2021 लेखा 3054 मार्ग व पुल ग्रामीण रस्ते विकास अंतर्गत रा. मा. 07 ते कारवाडी गावादरम्यान 30 लक्ष रूपये खर्चून होत असलेल्या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ठ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत काम बंद पाडले. रस्त्यावर अगोदर पडलेले खड्डे न बुजवता त्यावरच बी. बी. एम केल्याने रस्ता खाली-वर झाला. खाणीतील पक्की खडीचा वापर न करता विहिरीवरील कच्ची खडी वापरली. रस्त्यावरील धुळ साफ न करताच त्यावरच खडी पसरवली. टँग कोट नाही असे असंख्य आरोप करत आम्हास नवीन रस्ता नको आमचा पूर्वीचाच रस्ता पाहिजे अशा घोषणा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे शंकरराव फंटागरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत दिल्या.

यावेळी सचिन क्षीरसागर, रवींद्र फंटागरे, धनजंय झगडे, अमोल शिलेदार, दत्तात्रय भोसले, सर्जेराव भोसले, रमेश मोहिते, भारत कोकाटे, दिगंबर कोकाटे, अर्जुन फंटागरे, ज्ञानदेव फंटागरे आदींनी भाग घेत काम बंद पाडले. आ. आशुतोष काळे यांनी निकृष्ठ काम होत असल्यास तक्रार करावी, या जनजागृती मुळे गुणवत्तेमध्ये काम न करणार्‍या ठेकेदारांनी धसका घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या