Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंविरोधात महिलेची गंभीर तक्रार

धनंजय मुंडेंविरोधात महिलेची गंभीर तक्रार

मुंबई –

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होतं त्या करुणा शर्मा यांनी आता

- Advertisement -

त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.

यापूर्वी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी तक्रार केली होती. मात्र त्यांनी ती तक्रार मागे घेतली होती.

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

करुणा शर्मा यांनी असाही आरोप केला आहे की त्यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले जात नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या