कार्तिक पौर्णिमा : पद्मालय यात्रोत्सव रद्द

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव – Jalgaon

एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थानने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय श्री गणपती मंदीर देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

आज दि.29, 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये सालाबाद प्रमाणे होणारी त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा उत्सव बंद ठेवण्यात आला आहे.

यामुळे अनेक वर्षांपासून त्रिपुरारी पौर्णिमेला भरणारा यात्रोत्सव यंदा होणार नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासकिय नियमावलीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदीर व्यवस्थापनाने कळविले आहे.

पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यांना संबोधले जाते.

त्रिपुरारी पौर्णिमेला संपुर्ण खान्देशातून भाविक भक्त पद्मालय देवस्थानला दर्शनासाठी येत असतात. वर्षभर केलेले संकल्प, व्रत, नैवेद्य, नवस पुर्ण करण्यासाठी त्रिपुरारी पोर्णिमेला पद्मालय येथे मोठा यात्रा उत्सव होतो. यामध्ये ग्रामीण भागासह शहरांतूनही भाविक भक्त येतात.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेसह तीन दिवस देवस्थान दर्शनासाठीसुद्धा बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान या तिघंही दिवशी मंदीर परिसरात खाद्यपदार्थासाठी हॉटेल, कटलरी, दुकान, रसवंती, फेरीवाले कुणालाही व्यवसायालासुद्धा बंदी ठेवण्यात आले आहे. भाविक भक्तांना नवस, नैवद्य, धार्मिक पुजा विधी करता येणार नसून तीन दिवस मंदीर बंद राहणार आहे.

शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार यात्रा व मंदीर बंदचा निर्णय घेण्यात आला असून भाविक भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहनही मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *