Wednesday, April 24, 2024
Homeधुळेकार्तिक पटेल याने यूपीएससी परीक्षेत देशात सातवा  क्रमांक पटकावल्याने संस्थेतर्फे गौरव

कार्तिक पटेल याने यूपीएससी परीक्षेत देशात सातवा  क्रमांक पटकावल्याने संस्थेतर्फे गौरव

शिरपूर : Shirpur

आर. सी. पटेल संकुलाचा माजी विद्यार्थी कार्तिक पटेल याने यूपीएससी परीक्षेत देशात सातवा  क्रमांक पटकावल्याने संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, प्राचार्य पी. व्ही. पाटील यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला.

- Advertisement -

कार्तिक शरद पटेल याने २०१९ च्या झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत झालेल्या परीक्षेत सेंट्रल आर्मड पोलीस फोर्सेस मध्ये गुणवत्ता निवड यादीत सातव्या क्रमांकाने यश संपादन केले आहे.

कार्तिक शरद पटेल याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आर.सी.पटेल इंग्रजी माध्यमिक शाळा शिरपूर तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आर.सी.पटेल मेन बिल्डिंग येथे पूर्ण केले आहे. तसेच बी. टेक. सिविल इंजीनियरिंग या विषयात मुंबईच्या नामांकित महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेली आहे.

माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, त्याचे वडील शरद पटेल, प्राचार्य पी. व्ही. पाटील यांनी कौतुक केले.

कार्तिक पटेल यांचे वडील शरद पटेल हे पातोंडा ता.नंदुरबार ह.मु. मयुर काॉलनी शिरपूर (चांदपुरी ता. शिरपूर येथील मूळ रहिवासी) रहिवासी आहेत. सर्वसाधारण सामान्य शेतकरी असून त्यांच्या मुलाने केलेली ही कामगिरी निश्चितच युवकांसाठी, समाजासाठी कौतुकास्पद आहे. एका सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं शैक्षणिक क्षेत्रात इतकी उंच भरारी मारू शकतील हे, हे निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या