Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedकार्तिक-कियाराच्या आगामी चित्रपट ‘सत्यनारायण की कथा’चे नाव का बदललं?

कार्तिक-कियाराच्या आगामी चित्रपट ‘सत्यनारायण की कथा’चे नाव का बदललं?

कियारा अडवाणी ( Kiara Advani) आणि कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांची मुख्य भूमिका असलेला ‘सत्यनारायण की कथा’ (Satyanarayan Ki Katha) या चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं आहे.

आता ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) असे नवीन नाव देण्यात आल्याचे आर्यनने स्पष्ट केले.

- Advertisement -

कार्तिक आर्यननं चित्रपटाच्या नव्या नावाची माहिती इंस्टाग्रामवर दिली आहे. यासोबतच त्याने चित्रपटातील स्वतःचा आणि कियारा अडवाणीचा फर्स्ट लूकही शेअर केला आहे.

गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा होताच त्याच्या नावावरून वाद सुरू झाला होता. अनेकांनी या चित्रपटाला हिंदुत्वविरोधी म्हटलं होतं. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस करत असून निर्मिती साजिद नादियावाला यांनी नमह पिक्चर्सबरोबर करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या