अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात

by

सध्या पृथ्वीराज (Prithviraj) सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. महावीर राजा पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे. पृथ्वीराज महाराजांची भूमिका साकारली आहे अक्षय कुमारनं. (Akshay Kumar)

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. येत्या ३ जूनला हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दाखल होणार आहे. (Samrat Prithviraj Chauhan)

पण त्याचपूर्वी ‘पृथ्वीराज’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. (Akshay Kumar new film)

मिळालेल्या माहितीनुसार, करणी सेनेने (Karni Sena) या चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. याविषयी यशराज फिल्म्सच्या सीईओ अक्षय विधाने यांच्याशी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती करणी सेनेचे प्रवक्ते सुरजित सिंग राठोड यांनी दिली आहे.

या चर्चेदरम्यान चित्रपटाचे नाव बदलू असे आश्वासन दिल्याचे राठोड यांनी सांगितले. पण याबाबत अजूनही यशराज फिल्म्सकडून कोणतंच स्पष्टीकरण आलेलं नाही.

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. त्याचबरोबरीने संजय दत्त, सोनू सुद, आशुतोष राणा देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.