Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश'या' राज्यात देखील नाईट कर्फ्यूची घोषणा

‘या’ राज्यात देखील नाईट कर्फ्यूची घोषणा

दिल्ली | Delhi

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या करोना विषाणूसंदर्भात खबरदारी म्हणून महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. यानंतर आता

- Advertisement -

कर्नाटक सरकारनेही राज्यात नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. हा नाईट कर्फ्यू आजपासून २ जानेवारीपर्यंत लागू राहील. तसेच तो रात्री १० वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत असेल.

यासंदर्भात बोलताना कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले, की हा (नाईट कर्फ्यू) इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना व्हायरसपासून बचावासाठी तसेच त्याला रोखण्यासाठी करण्यात आला आहे. आम्ही राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवरही लक्ष ठेऊन आहोत.

यावेळी ख्रिसमस उत्सवानिमित्त जल्लोषाची परवानगी दिली जाईल का? असा प्रश्न विचारला असता, आरोग्यमंत्री म्हणाले, २३ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान रात्री १० वाजेनंतर कुठलाही कार्यक्रम अथवा उत्सव साजरा करण्याची परवानगी नसेल. तसेच हा नियम सर्वच कार्यक्रमांसाठी लागू असेल.

दरम्यान, ब्रिटनहून एअर इंडियाच्या विमानातून भारतातील वेगवेगळ्या शहरांत पोहचलेले एकूण २१ प्रवासी करोना संक्रमित आढळल्यानंतर देशाला हादरा मोठ्या बसलाय. हे प्रवासी दिल्ली, चेन्नई, अमृतसर, कोलकाता, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या विमानतळांवर दाखल झालेले आहेत. त्यामुळे संबंधित राज्यांत आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला सुरुवात करण्यात आलीय. हे प्रवासी करोना संक्रमित आढळले असले तरी हा ब्रिटनमध्ये आढळून आलेलं करोनाचं नवं स्वरुप आहे का? हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. संक्रमित व्यक्तीचे नमुने चाचणीसाठी पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ वायरोलॉजी’कडे पाठवण्यात आलेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या