Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकर्नाटक मुख्यमंत्र्यांचा गुरुवारी शपथविधी?

कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा गुरुवारी शपथविधी?

नवी दिल्ली/बंगळुरू । वृत्तसंस्था New Delhi, Bangalore

‘दक्षिणेचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाणारे कर्नाटक राज्य काँग्रेसने जिंकले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात चुरस दिसून येत आहे. मुख्यमंत्रिपदी कोणाला पसंती दिली जाते ते अजून निश्चित झालेले नसताना कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त मात्र ठरला आहे. वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी येत्या गुरुवारी (दि.18) होणार आहे.

- Advertisement -

शपथविधीला पक्षनेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व ज्येष्ठनेते उपस्थित राहणार आहेत. तसेच, समविचार पक्षांना शपथविधीची निमंत्रणे पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने तीन केंद्रीय निरीक्षकांची नेमणूक केली आहे. काँग्रेस विधिमंडळ नेता निवडीसाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पक्षाचे ज्येष्ठनेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे महासचिव जितेंद्र सिंग आणि माजी महासचिव दीपक बाबरिया यांची कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याबाबत के. सी. वेणूगोपाल यांनी ट्विट केले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी नेता निवडीची धावपळ काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. वाय. शिवकुमार आणि ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. अशावेळी पक्षात कोणताही वाद अथवा मतभेद निर्माण होऊ नयेत म्हणून काँग्रेस नेतृत्व सावधपणे पावले टाकत आहे. त्याचाच भाग म्हणून आज काँग्रेस विधिमंडळ नेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बेळगावातील नेत्यांना मंत्रिपदे?

राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर आता सरकार स्थापनेबरोबरच मंत्रिपदांसाठी नेत्यांच्या नावांची चर्चाही सुरू झाली आहे. मंत्रिपदासाठी जिल्ह्यातून चार नावे चर्चेत आली आहेत. त्यात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, माजी मंत्री व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी तसेच बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर याच्या नावांचा समावेश आहे.

कर्नाटकात पोस्टरबाजी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी पक्षाचे नेते सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या समर्थकांनी त्यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घोषित करावे, अशी मागणी करणारे पोस्टर राज्यभर झळकावले आहेत. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्या समर्थकांनी ङ्गकर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्रीफ असा उल्लेख केलेले पोस्टर्स बेंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर लावले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळवल्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार ही दोन्ही नावे मुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहेत. अशावेळी डी के शिवकुमार यांनी स्वतःच त्याबाबत सूचक वक्तव्य करून तसे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या