Saturday, May 11, 2024
Homeनगरआ. काळेंकडून कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरला 13 ऑक्सिजन काँसट्रेटर मशिन

आ. काळेंकडून कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरला 13 ऑक्सिजन काँसट्रेटर मशिन

कोपरगाव (प्रतिनिधी) – आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरु केलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरला व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथील कोविड केअर सेंटरला 11 लाखाची 13 ऑक्सिजन काँसट्रेटर मशीन भेट दिले.

आ.काळे म्हणाले, करोना विषाणूने अनेक कुटुंबांचे आधार हिरावून घेतले. सर्व प्रकारच्या संकटात राज्यातील सहकारी साखर कारखानदारीने वेळोवेळी मोलाची मदत केली आहे. न भूतो न भविष्यती आलेल्या जीवघेण्या संकट समयी सहकारी साखर कारखान्यांनी मदत करावी असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या नात्याने कोपरगाव येथे सुरु करण्यात आलेल्या 100 ऑक्सिजन बेडची सुविधा असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरला कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या सहकार्याने 13 ऑक्सिजन काँसट्रेटर मशीन दिले आहेत. अजूनही पाच काँसट्रेटर मशीन देणार आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लँटचे काम प्रगतीपथावर असून ना. पवारांनी केलेल्या सूचनेनुसार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऑक्सिजन प्लँट उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनचे संकट कायमस्वरूपी टळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका आरोग्य अधिकारी संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक अजीज शेख, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, रमेश गवळी, कृष्णा आढाव, नारायण लांडगे, विशाल निकम, डॉ. दीपक पगारे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. भाग्यश्री घायतडकर, डॉ. राजेंद्र रोकडे, डॉ. अभिजित आचार्य, डॉ. रवींद्र शेळके, शेखर झगडे आदी उपस्थित होते.

13 ऑक्सिजन काँसट्रेटर मशिनमुळे ऑक्सिजनची अडचण दूर होवून आरोग्य विभागाची चिंता कमी होण्यास मदत होणार आहे. यापूर्वीही आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास व्हेंटीलेटर, बायपॅप, काँसट्रेटर मशिन साहित्य दिले आहे. कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास आ. काळे तातडीने सोडवीत असल्यामुळे आरोग्य विभागाचे काम सोपे होत आहे.

– डॉ.कृष्णा फुलसौंदर

- Advertisment -

ताज्या बातम्या