Wednesday, April 24, 2024
Homeनगरवीजपंप चोरणारे जेरबंद

वीजपंप चोरणारे जेरबंद

कर्जत | प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील काही गावातील शेतक-यांच्या पाणी सिंचनाच्या मोटरी चो-यांचे प्रमाण वाढले होते.

- Advertisement -

त्यामध्ये वडगाव तनपुरा येथील शेतकरी वैभव तनपुरे यांच्या विहीरीवरील ४० हजार रुपये किमतीची २० हॉर्सपॉवरची मोटार काही दिवसांपुर्वी चोरीस गेली होती. तसा गुन्हा कर्जत पोलीस स्टेशनला दाखल होता.

पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवुन गुप्त बातमीदारांमार्फत माहीती काढुन संशयित कांतिलाल दत्तात्रय जत्ती, वय २० वर्षे, रा. वडगाव तनपुरा ता. कर्जत यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मोटार चोरीची कबुली दिली.

पोलीसांनी सदरची मोटार कोणास विकली याची चौकशी केली असता त्याने सदरची मोटार कर्जत येथील भंगारवाला बाजीराव मारुती वाघमोडे रा. कर्जत यास विकल्याचे सांगितले.

पोलीसांनी कर्जत येथील भंगारवाल्याच्या दुकानात जाऊन तपासणी केली असता चोरलेली मोटार मिळुन आली.

चोरीचा माल खरेदी केल्याने भंगार दुकानदार बाजीराव लक्ष्मण वाघमोडे यास अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार सलीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, सुनिल खैरे, वैभव सुपेकर, सचिन वारे यांनी केली आहे. अधिक तपास सलीम शेख हे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या