Friday, May 10, 2024
Homeनगरकर्जतमध्ये 13 जागांसाठी 89 उमेदवार रिंगणात

कर्जतमध्ये 13 जागांसाठी 89 उमेदवार रिंगणात

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत नगरपंचायतीच्या 13 जागेसाठी 89 उमेदवारी अर्ज दाखल झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली. 17 जागेसाठी एकूण 100 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या ओबीसी आरक्षणाच्या स्थगितीमुळे आणि राज्य निवडणुक आयोगाच्या नुतन मार्गदर्शक सुचनेनुसार चार प्रभागात 11 उमेदवारी अर्ज वगळण्यात आले. दाखल अर्जात भाजप 27, राष्ट्रवादी 23, काँग्रेस 9, शिवसेना 3, रासप 2, वंचित बहुजन आघाडी 3 आणि अपक्ष 22 असे 13 जागेसाठी एकूण 89 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

- Advertisement -

कर्जत नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची मोठी झुंबड पाहायला मिळाली. अखेर प्रशासनास पोलीस दलाची मदत घ्यावी लागली. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन करीत दाखल केले. मंगळवारी 64 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज संख्या- प्रभाग क्रमांक 2 जोगेश्वरवाडी आठ, प्रभाग क्रमांक 4 माळेगल्ली नऊ, प्रभाग क्रमांक 6 याशीननगर सात, प्रभाग क्रमांक 8 शाहूनगर आठ, प्रभाग क्रमांक 9 समर्थनगर सहा, प्रभाग क्रमांक 10 बेलेकर कॉलनी पाच, प्रभाग क्रमांक 11 बर्गेवाडी सात, प्रभाग क्रमांक 12 शहाजीनगर सहा, प्रभाग क्रमांक 13 गोदड महाराज गल्ली चार, प्रभाग क्रमांक 14 सोनारगल्ली आठ, प्रभाग क्रमांक 15 भवानीनगर सहा, प्रभाग क्रमांक 16 अक्काबाईनगर तीन, प्रभाग क्रमांक 17 भांडेवाडी 12 असे एकूण 13 प्रभागासाठी 89 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या दि 8 रोजी सदर दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या