Saturday, May 11, 2024
Homeनगरकर्जत बाजार समितीत 231 उमेदवारी अर्ज

कर्जत बाजार समितीत 231 उमेदवारी अर्ज

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 18 जागेसाठी 231 उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेल्या जुगलबंदीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची होणार आहे.

- Advertisement -

या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष पहावयास मिळणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक उमेदवारांनी कर्जत व चोंडी या ठिकाणी जोर बैठका काढल्या आहेत. अनेकांना उमेदवारी अर्ज भरून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज भरणारांमध्ये अनेक दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे.

शेतकर्‍यांची कामधेनु असणारी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या 28 एप्रिल रोजी होणार असून आज या साठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज अनेक दिग्गज नेत्यांसह अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या मध्ये सर्वसाधारण सहकारी संस्था मतदारसंघांमध्ये 11 जागेसाठी एकूण 124 अर्ज, ग्रामपंचायत मतदार संघामध्ये 4 जागेसाठी एकूण 77 अर्ज, अडते व्यापारी मतदारसंघांमध्ये एकूण 2 जागेसाठी 18 अर्ज, हमाल मापाडी मतदारसंघांमध्ये 1 जागेसाठी 12 अर्ज प्राप्त झाले असून एकूण 18 जागेसाठी तबल 231 अर्ज दाखल दाखल झाले आहेत.

अर्जांची छाननी ही 5 एप्रिल रोजी होणार असून माघार घेण्याची मुद्दत ही 20 एप्रिल आहे. माघारी नंतर खर चित्र स्पष्ट होणार असून कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिति निवडणूक ही चुरशीची होणार आहे हे मात्र निश्चित.

- Advertisment -

ताज्या बातम्या