Thursday, April 25, 2024
Homeजळगावविद्यार्थींनीना स्वरक्षणासाठी कराटेे प्रशिक्षण

विद्यार्थींनीना स्वरक्षणासाठी कराटेे प्रशिक्षण

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

शहरातील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील (Nanasaheb Yashwantrao Narayanrao Chavan College of Arts, Science and Commerce) विद्यार्थी विकास समिती, (Student Development Committee) अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसिद्धा अभियान (Swayamsiddha Abhiyan) अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थींनीसाठी आयोजित कराटे प्रशिक्षण (Karate training) मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

- Advertisement -

कराटे प्रशिक्षणाचे प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव (Principal Dr. S.R. Jadhav) यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी कराटे प्रशिक्षक छोटूभाऊ चौधरी, उपप्राचार्य डॉ.यु.आर.मगर विद्यार्थी विकास समितीचे प्रमुख उपप्राचार्य डॉ.जी.डी.देशमुख, अंतर्गत तक्रार निवारण समिती प्रमुख प्रा.अनुराधा कुलकर्णी, युवती सभा प्रमुख प्रा.पार्वती पाडवी, प्रा.सुवर्णा मोरे, प्रा.मंगला सूर्यवंशी आणि प्रा.डॉ.सौ. उज्वला नन्नवरे आदि उपस्थित होते.

प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव यांनी सांगीतले की, विद्यार्थिनींनी (students) आपल्या व्यक्तिमत्वाच्या (Personality) दृष्टीने तसेच शारीरिक,मानसिक दृष्टीने सक्षम झाले पाहिजे.त्यांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कराटेचे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे. तसेच कराटेचे प्रशिक्षण (Karate training) घेतल्यानंतर आपल्या मैत्रिणींनाही कराटेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

छोटूभाऊ चौधरी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना कराटेच्या संदर्भात योग्य त्या मार्गदर्शक सूचना करून प्रत्यक्ष कराटेचे प्रात्यक्षिकतून प्रशिक्षण (Karate training) दिले. यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. आर.जाधव, उपप्राचार्य प्रा. डॉ.एस.डी.महाजन, उपप्राचार्या प्रा.डॉ. उज्वल मगर, उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वय डॉ.जी.डी. देशमुख,उपप्राचार्य, डॉ.पी.जे. परमार आदि सहकार्य लाभले. प्रा.सौ.अनुराधा कुलकर्णी प्रा. पार्वती पाडवी,प्रा.सुवर्णा मोरे,प्रा.सौ.मंगला सूर्यवंशी, प्रा.डॉ. सौ.उज्वला नन्नवरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार डॉ.सौ.उज्वला नन्नवरे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या