Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : करंजवण धरण ओव्हरफ्लो, 'इतक्या' पाण्याचा विसर्ग

Video : करंजवण धरण ओव्हरफ्लो, ‘इतक्या’ पाण्याचा विसर्ग

ओझे | विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे असलेले करंजवण धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज रात्री ९ वाजता धरणातून कादवा नदी मध्ये ३०१ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग येणार असल्याची माहिती करंजवण धरण शाखा अभियंता शुंभम भालके यांनी देशदूतशी बोलताना दिली…

- Advertisement -

तसेच पालखेड धरणातून सध्या २१८ क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू असून पालखेंड धरणही पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात येणाऱ्या पावसाची आवक लक्षात घेवून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती पालखेड धरण शाखा अभियंता सुदर्शन सानप यांनी दिली.

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी; शेतकरी सुखावले, पिकांना जीवदान

दिंडोरी तालुक्यात कालपासून वळीव स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली असून तालुक्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस पडत आहे त्यांमुळे धरणामध्ये पाण्याची आवक हळूहळू वाढत आहे.तसेच धरणाच्या पातळी जशी जशी वाढ होईल तसा धरणातून पाण्याचा विसंर्ग वाढविण्यात येईल.त्यांमुळे कादवा नदी काठावरील गावाना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Crime News : गुटख्याची तस्करी करणार्‍या दोघांना अटक; ‘इतक्या’ लाखांचा गुटखा जप्त

- Advertisment -

ताज्या बातम्या