Thursday, April 25, 2024
Homeनगरकनोलीत दोन गटांत हाणामारी, परस्परविरोधी फिर्यादी दाखल

कनोलीत दोन गटांत हाणामारी, परस्परविरोधी फिर्यादी दाखल

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील कनोली येथे जमिनीच्या वादावरून ग्रामपंचायत कार्यालया समोरचं दोन गटात दगड, काठीच्या साह्याने हाणामारीची घटना घडली. यात पाच जण जखमी झाले तर आश्वी पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

- Advertisement -

आश्वी पोलीस स्टेशनला नवनाथ उर्फ राधाकिसन वामन जगताप व संजय पर्बत वर्पे यांनी एकमेकांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून उत्तम पर्बत वर्पे, सौरभ उत्तम वर्पे व गोरक्षनाथ वामन जगताप, तुषार गोरक्षनाथ जगताप, स्वप्नील गोरक्षनाथ जगताप या दोन कुटुबांत जमिनीचा वाद असताना गुरुवार दि. 17 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास अचानक ग्रामपंचायत कार्यालया समोर जगताप व वर्पे एकमेकांसमोर आले. एकमेकांकडे बघून शिवीगाळ सुरू झाल्याने शाब्दीक वादाचे रुपांतर लाथाबुक्क्या व लाकूड, दगडाच्या साह्याने हाणीमारीत झाले. यात जगताप पिता पुत्र तर वर्पे पिता पुत्र असे पाच जण जखमी झाले. याबाबत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभिर्य ओळखून ते घटनास्थळी दाखल झाले तर जखमींना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हसन शेख करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या