Monday, April 29, 2024
Homeनगरकान्हुर पठारला शेतकर्‍यांचा महावितरण कार्यालयासमोर ठिय्या

कान्हुर पठारला शेतकर्‍यांचा महावितरण कार्यालयासमोर ठिय्या

पारनेर |प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील कान्हुर पठार उपकेंद्रातंर्गत येणार्‍या किन्ही , बहिरोबावाडी , तिखोल या गावांमधील कृषीपंपांचे थकीत विजबील वसुलीसाठी महावितरणने विजपुरवठा खंडित केल्याने सोमवारी संतप्त शेतकर्‍यांनी कान्हुर पठार येथिल महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन केले.

- Advertisement -

या वेळी शेतकरी नेते अनिल देठे पाटील व आंदोलक शेतकर्‍यांनी मागील काही दिवसांपासून शेतीसाठी सुरळीत व पुर्ण क्षमतेने विजपुरवठा होत नसल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे असा संतप्त सवाल उपस्थित केला. तसेच यापुढे सुरळीत व अखंडितपणे विजपुरवठा न मिळाल्यास एकही शेतकरी वीजबिल भरणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या वेळी किन्हीचे उपसरपंच हरेराम खोडदे , माजी सरपंच मानसिंग देशमुख , किसन खोडदे , माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग व्यवहारे, बापु व्यवहारे ,राजाराम देठे पाटील,यशवंत व्यवहारे, संजय खोडदे, सखाराम खोडदे , मारूती सावंत , गंगाधर देठे पाटील , जयसिंग खोडदे, बाबासाहेब व्यवहारे ,संदिप खोडदे , संपत खोडदे , अशोक खोडदे मेजर ,सुभाष खोडदे , साहेबराव खोडदे , संजय खोडदे , रामभाऊ साकुरे , दत्ताञय साकुरे , भारत ठाणगे , रामदास देठे , भानुदास देठे , संग्राम खोडदे , मोहन मोढवे , किरण व्यवहारे , दादाभाऊ मोढवे , संतोष व्यवहारे , सुभाष मोढवे , सुनील खोडदे , अशोक खेसे , नितीन खोडदे , प्रताप खोडदे , चेतन पवार , विनोद खोडदे ,अनिल खोडदे आदि उपस्थित होते.

किन्ही, बहिरोबावाडी, तिखोल या गावांमधील कृषीपंपांना सुरळीत व पुर्ण क्षमतेने विजपुरवठा मिळाल्यास शेतकरी वीजबिल भरतील परंतु महावितरण कंपनीने देखील वारंवार खंडित होणार्‍या विजेच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा शेतकर्‍यांसह पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

– अनिल देठे पाटील, शेतकरी नेते

- Advertisment -

ताज्या बातम्या