Thursday, April 25, 2024
Homeधुळेकंगना रनौतच्या पुतळ्याचे दहन

कंगना रनौतच्या पुतळ्याचे दहन

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

हरियाणा आणि हिमाचल पोलिसांचे संरक्षण मला चालेल परंतु मुंबई पोलिसांचे संरक्षण नको, मुंबई पोलीस (Mumbai Police) चुकीचे असून मला मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असे वक्तव्य करुन…

- Advertisement -

मुंबई पोलिसांचा एकप्रकारे अपमानच केला आहे. तसेच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे तमाम मराठी आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.

कंगना रनौतच्या या वक्तव्याचा(Shivsena) शिवसेना धुळे जिल्हा महिला आघाडी आणि पदाधिकार्‍यांनी तीव्र धिक्कार करून कंगना रनौतच्या पुतळ्याला चपला मारीत दहन केले. यावेळी कंगणा विरुध्द घोषणा देत तीव्र निषेध केला. यापुढे असा अपमान सहन केला जाणार नाही.

अशा तीव्र प्रतिक्रिया देखील महिला पदाधिकारी उज्वला काटकर, नगरसेविका ज्योत्स्ना पाटील, अरुणा मोरे, नंदा माळी, आशा पाटील यांनी दिल्या.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, युवासेना सहसचिव पंकज गोरे, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, संजय गुजराथी, रवींद्र काकड, प्रफुल्ल पाटील, देविदास लोणारी, भटू गवळी, रामदास कानकाटे, केशव माळी, स्वप्नील सोनवणे, भूषण चौधरी, गोल्डन कढरे, किशोर आढावे, हरिश्चंद्र माळी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या