एसटी सेवकांच्या प्रश्नांवर कामगार सेना आक्रमक

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

एसटी महामंडळाने लागू केलेली स्वेच्छा सेवानिवृत्त योजना सेवकांना लाभदायक नाही.

त्यामुळे निवृत्तीनंतर सेवकांना 90 दिवसांऐवजी 180 दिवसांचा लाभ द्यावा, योजनेला मुदतवाढ मिळावी तर निवृत्ती नंतर मिळणारी सर्व रक्कम एकरकमी देऊन गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता इतर गुन्हे निकाली काढावेत, निवृत्त सेवकांच्या पाल्यांना महामंडळात समाविष्ट करावे, अशी मागणी कामगार सेनेने केली आहे.

एसटीची स्वेच्छा सेवानिवृत्त योजना, अपहार प्रकरणात वाहकांच्या अन्यायकारक बदल्या, सुधारित शिस्त व आवेदन कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करणे, एसटी चालकांना खासगी प्रशिक्षण केंद्रा ऐवजी महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्रातर्फे दाखला देऊन चालक परवाना नूतनीकरण, नादुरुस्त एटीआयएम मशीन प्रकरणाची चौकशी करुन वाहकांकडून चुकीच्या पद्धतीने वसुली केलेली पैसे ट्रायमेक्स कंपनीकडून वाहकांना परत करणे तर एसटी सेवकांच्या कुटुंबाना मिळणारा मोफत स्लीपर कोच वाहनांमध्ये मर्यादीत आसने आरक्षित ठेवून ग्राह्य धरण्यास मान्यता देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *