Saturday, May 11, 2024
Homeनाशिककामायनी, महानगरी एक्स्प्रेस २ डिसेंबर पासून नांदगाव थांबे रद्द.. ?

कामायनी, महानगरी एक्स्प्रेस २ डिसेंबर पासून नांदगाव थांबे रद्द.. ?

नांदगाव | Nandgaon (प्रतिनिधी) :

कामायनी,महानगरी एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वेगाड्या आजपर्यंत नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबत आहेत. मात्र २ डिसेंबर पासून कामायनी, महानगरी एक्स्प्रेसचे थांबे आरक्षण यादीतून रद्द करण्यात असल्याचे निदर्शनास आल्याने काशी एक्स्प्रेस पाठोपाठ कामायनी, महानगरी, झेलम एक्स्प्रेस या रेल्वे गाड्याचे थांबे रद्द करण्यात आल्याने नांदगावकरांची मोठी गैरसोय निर्माण होणार आहे.

- Advertisement -

नांदगाव रेल्वे सल्लागार समितीच्या वतीने नांदगाव रेल्वे स्थानक प्रबंधक विश्वजित मिना यांच्या सोबत नांदगाव रेल्वे सल्लागार समिती व सामाजिक कार्यकर्ते यांनी चर्चा केली.

या चर्चेतून नांदगाव स्टेशन प्रबंधक मिना यांनी सांगितले की, रेल्वे प्रशासनाने कामायनी, महानगरी एक्स्प्रेस थांबे बंद करण्यात येणार असल्याचे अधिकृत पत्र नाही. मात्र सर्व रेल्वेगाड्या (कोव्हीड स्पेशल) सुपरफास्ट झाल्याने नांदगाव रेल्वे स्थानकावरील सर्व रेल्वे गाड्याचे थांबे रद्द होऊ शकतात. या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे.

१ डिसेंबर पासून झेलम एक्स्प्रेस सुरू होणार असल्याचे रेल्वे सुत्रांकडून समजते. झेलम गाडीचा नांदगाव थांबा पुर्वरत होणार का ? याकडे नांदगांवकरांचे लक्ष लागले आहे.

नांदगावकरांनी रेल्वे गाड्यांंना भरभरून प्रतिसाद देत रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहे. सध्या देशात कोरोनाची परिस्थिती बघता रेल्वे प्रशासनाने नांदगाव रेल्वे स्थानका संदर्भात दुटप्पी भुमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

नांदगाव रेल्वे स्थानकावर नियमित जेमतेम १० रेल्वे प्रवासी रेल्वे गाड्याचा थांबा आहे. नांदगाव रेल्वे स्थानकावरील सर्व रेल्वेगाड्याचे थांबे रद्द करण्यात आले. तर नांदगावकरांची मोठी गैरसोय निर्माण होणार आहे.

कामायनी, महानगरी, काशी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्याचे थांबे पुर्वरत करण्यासाठी जन आंदोलन छेडण्याचा इशारा रेल्वे सल्लागार समितीचे तुषार पांडे यांनी सांगितले. या बैठकीत नांदगाव रेल्वे सल्लागार समितीचे अध्यक्ष तुषार पांडे, जायटस प्राईड अध्यक्ष वामन पोतदार, भाजपा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष संजय सानप, पत्रकार भगवान सोनवणे, संजय मोरे, अतुल वाणी, अनिल धामणे, आदी उपस्थित होते.

दरम्यान, नांदगांंवकरांनी मोठ्या संघर्षातून थांबा मिळविलेल्या वरील रेल्वेगाड्या वरिष्ठ पातळीवरुन (कोव्हीड-१९) फायदा घेऊन पुन्हा इतरत्र हलविण्याचा घाट घालत असल्याची चर्चा आहे. मात्र नांदगांंवकरांनी जन आंदोलन उभे करण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या