Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशअवघ्या ८५ मिनिटांसाठी कमला हॅरिस झाल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष, काय आहे कारण?

अवघ्या ८५ मिनिटांसाठी कमला हॅरिस झाल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष, काय आहे कारण?

दिल्ली l Delhi

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला होता. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अनुपस्थितीत कमला हॅरीस (Kamala Harris) यांनी पहिल्यांदाच राष्ट्रपती पदाचा पदभार स्विकारला होता. त्यामुळे ही जबाबदारी सांभाळणाऱ्या त्या अमेरिकेच्या पहिल्याच महिला बनल्या आहेत.

- Advertisement -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांची दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांची कोलोनोस्कोपीची चाचणी करण्यात येणार होती. या चाचणीसाठी त्यांना काही वेळ भूल देण्यात येणार होती. त्यामुळे या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे सर्व अधिकार बाडयन यांनी कमला हॅरिस यांना दिले. बायडन यांच्या शरिराची पूर्ण तपासणी अमेरिकेतील वॉल्टर रिड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये करण्यात आली.

अमेरिकेचं अध्यक्षपद स्विकारल्यानंतर जो बायडन यांची ही पहिली ‘फूल बॉडी एक्झामिनेशन’ (Full Body Examination) आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर बायडन यांनी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी कमला हॅरिस आणि व्हॉईट हाऊसचे चिफ ऑफ स्टाफ रोन क्लेन यांच्याशी चर्चा करून पुन्हा कार्यभार स्विकारला. या दरम्यान, कमला हॅरीस यांनी त्यांच्या नेहमीच्या व्हाईट हाऊस वेस्ट विंग येथील कार्यालयातूनच कामकाज सांभाळला.

कमला हॅरीस या गेल्या वर्षी बायडन यांच्यासोबत उप-राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. यासोबतच या पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या महिला बनल्या. तसंच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय- दक्षिण आशियाई अमेरिकन व्यक्तीही बनल्या होत्या.

दरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष यांच्यातील तात्पुरत्या स्वरुपातील का होईना परंतु, सत्ता हस्तांतरणाची गोष्ट यासाठी महत्त्वाची ठरतेय कारण या दोन्ही नेत्यांत नुकतंच काही कारणावरून मतभेद समोर आले होते. हॅरिस यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमला हॅरिस यांना सत्तेतून बाजुला टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर बायडन यांच्या टीमच्या म्हणण्यानुसार, हॅरिस अमेरिकेच्या जनतेसोबत खेळ खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या महिन्यात बायडन यांच्या तुलनेत हॅरिस यांची अप्रुव्हल रेटिंगही खाली घसरल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे, लवकरच हॅरिस यांना उपराष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात येऊ शकतं, अशी शक्यताही राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या