देशात बेरोजगारी आणि उपासमारी असतांना नव्या संसद भवनाची गरज काय?

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

राजधानी दिल्लीत नवे संसद भवन उभे राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर रोजी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले. त्यासाठी तब्बल एक हजार कोटींचा खर्च येणार आहे. यावरून प्रसिद्ध अभिनेते व मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

“अर्धा देश उपाशी झोपतो आहे. अशा परिस्थितीत एक हजार कोटींच्या संसद भवनाची गरज काय? करोना व्हायरसमुळे लोकांनी आपलं काम गमावलं आहे. चीनची भिंत बांधत असताना हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या देशातील नेत्यांनी सांगितलं की ही भिंत तुमच्या संरक्षणासाठी आहे. आता माझा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे की तुम्ही कुणाच्या संरक्षणासाठी नवं संसद भवन बांधत आहात? आदरणीय पंतप्रधानांनी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं” असं कमल हसन यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर रोजी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले. संसद भवनाची निर्मिती हा खरंतर २० हजार कोटींच्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे. सरकारच्या योजनेनुसार चार मजली संसद भवन हे ६४,५०० वर्ग मीटर परिसरात तयार केले जाणार आहे. यासाठी ९७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच २०२० साली नव्या संसदेचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. नव्या संसदेत लोकसभेच्या सभागृहात ८८८ इतकी आसन व्यवस्था असणार आहे. तर सेंट्रल हॉलमध्ये १२२४ इतकी आसन क्षमता असणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *