Thursday, April 25, 2024
Homeनगरनगर : सात दिवसांत कल्याण रोड परिसराचा पाणीप्रश्न मार्गी

नगर : सात दिवसांत कल्याण रोड परिसराचा पाणीप्रश्न मार्गी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपा स्थायी समितीच्या सभेमध्ये कल्याण रोडच्या पाणीप्रश्नावर चर्चा झाल्यानंतर सभापती मनोज कोतकर यांनी पाणीपुरवठा विभागाला

- Advertisement -

या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. नगरसेवक अप्पा नळकांडे यांनी आंदोलनाचा इशारा देताच पाणीपुरवठा विभागाने तातडीने वसंत टेकडी येथे टँकर मालक, चालक, वॉलमन व इंजिनिअर यांची बैठक घेऊन सात दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन सुरू केले आहे.

कल्याण रोड परिसरातील सर्व नागरिकांना पाणी मिळेल, या हेतूने सर्वांनी काम करावे. कोणीही हलगर्जीपणा व कामचुकारपणा केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. यावेळी नगरसेवक नळकांडे व सचिन शिंदे उपस्थित होते. नळकांडे म्हणाले, कल्याणरोडचा पाणीप्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.

पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत असून त्यांना पाण्यासाठी ताटकळत रहावे लागत आहे. यासाठी आणखी दोन टँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच टँकर चालकांची पैसे घेण्याबाबतची चौकशी होऊन कारवाई करण्यात येईल. कल्याण रोड परिसरात अनेक भाग नव्याने विकसित होत आहे.

याठिकाणी अजूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यात आली नाही. तरी त्या लवकरात लवकर टाकून सर्व नागरिकांना नळाद्वारे पाणी देण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी अप्पा नळकांडे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या