Thursday, April 25, 2024
Homeनगरकळसूबाई शिखरावर भाविकांची अलोट गर्दी

कळसूबाई शिखरावर भाविकांची अलोट गर्दी

अकोले |प्रतिनिधी| Akole

आदिवासींची कुलदेवता समजल्या जाणार्‍या कळसुबाईच्या दर्शनासाठी पाचव्या माळेला भाविकांनी अलोट गर्दी केली होती. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. म्हणून त्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे सुध्दा संबोधले जाते. कळसूबाई शिखराची उंची ही बारी गावाच्या पायथ्यापासून 1646 मी. उंच इतकी आहे

- Advertisement -

देवीचे मूळ घराणे हे इगतपुरी तालुक्यामध्ये असून इगतपुरी तालुक्यातील इंदोरच्या शेणे कुटुंबातील आहे. घटस्थापनेच्या वेळी नवरात्रामध्ये पाचवे आणि सातव्या माळीला कळसूबाई शिखरावर मोठी गर्दी होत असते. म्हणून या माळेला पाहुण्यांची माळ म्हणून ओळखले जाते. पाचव्या माळेला दहा ते बारा हजार भाविकांनी हजेरी लावली होती. कळसूबाई शिखराच्या पायवाटेवर पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत 6 इंच उंच व 45 इंच रुंद अशा 1200 पायर्‍या करण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी खूपच अवघड रस्ता आहे व पायर्‍या करणे शक्य नाही. अशा त्या ठिकाणी 500 मिटरच्या अंतरावर नवीन शिडी व रॅलींग वनखात्यामार्फत करण्यात आले आहे.

कळसूबाई ही देवी खरे तर त्र्यंबकेश्वरपासून ते भिमाशंकरपर्यंतच्या आदिवासी, जमातीच्या समन्वयाचे प्रतिक समजले जाते. कळसुबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून कानाकोपर्‍यातून भाविक येतात . नगर, नाशिक, मुंबई या ठिकाणाहून सर्वात जास्त भाविक येतात. कळसूबाई शिखरावर छोटे-मोठे हॉटेल असल्यामुळे भाविकांची गैरसोय दूर होते. काही ठिकाणी अरुंद शिडी असल्यामुळे गर्दी होत असते तसेच काही दुदैवी घटना घडू नये म्हणून राजुर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच बारी गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यही लक्ष ठेवून आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या