Friday, April 26, 2024
Homeनाशिककालिका मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरवात

कालिका मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरवात

नाशिक । Nashik

नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात शनीवार पासुन घटस्थापना अर्थात शारदीय नवरात्रौत्सोवाला प्रारंभ झाला.

- Advertisement -

नवरात्रीच्या पहिल्या माळेला विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना तर आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली. तर मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात पहाटे काकड आरती करण्यात आल्यानंतर सकाळी सहा वाजता मानाच्या ध्वजाचे ध्वजारोहण तसेच पुजन करण्यात आले.

सकाळी सनई चौघड्याच्या मंजुळ स्वरात देवीचे इशस्तव करण्यात आले तर मंदिरातील पुरोहितांच्या मंत्रोच्चार आणि जयघोषात विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली तर मंदिरात दैनंदिन पुजा, अर्चा, जप, आदी धार्मिक विधी करण्यात आले, तर सकाळी ८ वाजता आ. देवयानी फरांदे यांच्या हस्ते देवीची महापूजा तर मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली.

तसेच सायंकाळी महापौर सतिश कुलकर्णी यांच्या हस्ते देखील देवीची महाआरती करण्यात आली तर रात्री 9वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत देवीचा गोंधळ घातला.

मंदिर परिसरासह मुख्य रस्त्यावर भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

करोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी कालिका देवी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी न करता घरात बसुन देवीची आराधना करावी असे आवाहन कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आण्णा पाटील, सचिव डॉ प्रतापराव कोठावळे,कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया सदस्य किशोर कोठावळे, संतोष कोठावळे, आबा पवार विशाल पवार, योगेश पवार,माजी नगरसेवक दत्ता पाटील, सुरेंद्र कोठावळे आदींनी केले आहे

१०२ वर्षांनंतर यात्रा रद्द

करोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे ग्रामिदैवत असलेल्या कालिका माता यात्रात्सोव रद्द करण्यात आला आहे.

१०२ वर्षापुर्वी प्लेगची साथ आली होती त्यावेळी यात्रा बंद करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना महामारीच्या कारणास्तव यावर्षाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. यामुळे भाविकांना देवदर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे.

नवरात्रौत्सोवाच्या काळातील कालिकादेवी मंदिरात होणारी नित्यपुजा, तसेच इतर धार्मिक विधीसह मान्यवरांच्या हस्ते होणारी आरती, महापुजेचे सोशल मीडियाच्या माध्यमातून भाविकांना दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या