Friday, April 26, 2024
Homeनाशिकग्रामीण भागातून कल्हई व्यवसाय हद्द पार

ग्रामीण भागातून कल्हई व्यवसाय हद्द पार

ओझे | विलास ढाकणे

ग्रामीण भागातील अनेक व्यवसाय काळाच्या ओघात हद्दपार झालेले आहे. त्यांची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहे. त्यात एक व्यवसाय म्हणजे कल्हई व्यवसाय हा व्यवसाय सध्या काळानुरुप हद्दपार झालेले आहे.

- Advertisement -

काळ बदलला, माणसं बदलली, माणसांच्या गरजा बदलल्या, सोयीची संकल्पना सुध्दा बदलली. पर्याय उपलब्ध झाले. अगदी दैनंदिन आयुष्यातल्या वस्तू त्यामध्ये भांडी सुध्दा बदलली. तांबे , पितळाची भांडी गेली. त्याची जागा स्टिलने घेतली. त्यामुळे तांबे, पितळाची वस्तू वर चालणारी व्यवसायाला पर्यायाने उतरती कळा लागली. त्यात मुख्य व्यवसाय म्हणजे कल्हई व्यवसाय.

कित्येक वर्षानंतर सकाळी सकाळी आमच्या “येई कल्हई वाले ” अशी आरोळी ऐकायला आली. लहानपणी कल्हईवाले दर १० ते १५ दिवसांनी गावात येत असत. अन अंगणातल्या झाडांखाली त्यांचा वर्कशॉप मांडून शेजारी पाजारची अनेक घरातील भांडी कल्हई लावून चकाचक करून देत असतं. लहान मुले रिंगण करून कल्हई करण्याची गंमत पाहात असतं

आजकाल तांब्या पितळाची भांडी इतिहास जमा झाल्याने तसेच घरोघरी येणारे कल्हईवाले देखील दिसेनासे झाले आहे. आजच्या मुलांना कल्हई म्हणजे काय हेच माहीत नाही. कल्हई म्हणजे काय तर तांब्याच्या व पितळेच्या भांड्यांना आतून कथिल नामक धातूचा पातळ थर देण्याची प्रक्रिया म्हणजे कल्हई होय. परंतु आता मात्र कुठेच तांब्या, पितळाची भांडी दिसत नसल्यामुळे सध्या तरी कल्हई करणारे कारागिर दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून कल्हई व्यवसाय हद्द पार झाला असल्याचे चित्र दिसून येते. अशा नामशेष झालेल्या व्यावसायिकांना शासनाने विशेष स्वरुपाची मदत करावी, अशी मागणी होत आहे.

पूर्वी कल्हई चा व्यवसाय करून महिन्याकाठी ३००० ते ३५०० हजार रुपये कमाई करीत होतो. परंतु आता माञ तांब्या, पितळाची भांडी इतिहास जमा झाल्याने सध्या कोणी ही भांड्यांना कल्हई करीत नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

– चाचा मालेगाववाले, कल्हई व्यावसायिक

- Advertisment -

ताज्या बातम्या