Thursday, April 25, 2024
Homeनगरकालभैरव देवालयाचा मनमोहक, नयन सुखद नजराणा

कालभैरव देवालयाचा मनमोहक, नयन सुखद नजराणा

अकोले |प्रतिनिधी| Akole

येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ कालभैरव नाथ महाराजांचे देवालय असून सोमवारी त्यांच्या जयंती निमित्ताने दिव्यांची रोषणाई करण्यात आली.

- Advertisement -

त्याचा मनमोहक, नयन सुखद नजार्‍याने अकोलेकरांच्यो डोळ्यांचे पारणे फेडले.

अकोले येथील कालभैरव देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.दरवर्षी कालभैरव जयंती उत्साहात साजरी होत असते. सर्व भाविक व श्री स्वामी समर्थ सेवेकरी हे आज बाजरीची भाकर, वांग्याचे भरीत, ठेचा याचा नैवेद्य दाखवतात. नारळ, खडीसाखर, हार, उदबत्ती वाहून 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणतात.

कालभैरव नाथ महाराजांवर गावाच्या आठ दिशांचे संरक्षण करण्याची जबाबदारी टाकली आहे. असा ग्रंथ पुराणात संदर्भ आहे. त्यामुळे भाविक व सेवेकरी आपल्या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी कालभैरवनाथ महाराजांवर टाकून त्यांना संरक्षण करण्याची मनोभावे विनंती करतात.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुंदर रांगोळी, दिव्यांची आकर्षक रोषणाई केल्याने त्याचा सुंदर मनमोहक नजारा सर्व भाविक भक्तांना खिळवून ठेवताना दिसत होता. यावेळी समाजसेवक हेमंत दराडे यांनी लाडूचा प्रसाद भाविक भक्तांना वाटला.

- Advertisment -

ताज्या बातम्या