Saturday, April 27, 2024
Homeनगरकळस ग्रामस्थांचे महसूलमंत्र्यांना निवेदन

कळस ग्रामस्थांचे महसूलमंत्र्यांना निवेदन

कळस |वार्ताहर| Kalas

अकोले तालुक्यातील बहुचर्चीत कळस बुद्रुक गावातील ग्रामस्थांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

- Advertisement -

यांना कळस बुद्रुक येथे दौर्‍यावर असताना कळस येथे नवीन तलाठी ऑफिस बांधणीसाठी आणि सबस्टेशनची जागा पुन्हा मिळण्यासाठी साकडे घालण्यात आले.

संपूर्ण बागायती क्षेत्र आणि कोल्हार घोटी हायवेवर असलेल्या 5 ते 6 हजार लोकसंख्या असलेल्या कळस गावच्या तलाठी कार्यालयाला साधं दार देखील व्यवस्थित नाही तसेच पावसाळ्यात सर्व ठिकाणावरून गळत असलेल्या या एवढ्याशा खोलीची दुर्दशा दुर्दैवी आहे. कळस बुद्रुक, कळस खुर्द व सुलतानपूर या तीन गावचा महसुलाचा कारभार हाकणार्‍या तलाठ्याला गेल्या अनेक वर्षांपासून बसायलाच जागा नाही.

तसेच विविध कामासाठी आलेल्या शेतकरी बांधवांना दारात ताटकळत उभे राहुनच आपले काम करून घ्यावे लागते. वेळोवेळी महसूल प्रशासनाला याची जाणीव करून दिली तरी त्याकडे काना डोळा करण्यात येतो. तीन गावचा कारभार पाहणार्‍या तलाठ्याला अतिरिक्त पदभार देऊन दोनच दिवस कळस सजेला वेळ देता येतोय. असा सर्वच भोंगळ कारभार महसूल प्रशसनाचा आहे.

तसेच कळस येथे सबस्टेशन मंजूर झाले होते. त्यासाठी ग्रामपंचायतीने सदरील जागा एमएससीबीला सोपवली. पण सदरच्या सबस्टेशनसाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे सदरचे सबस्टेशन कुंभेफळ येथे झाले. पण जी जागा सबस्टेशन साठी एमएससीबीला दिली होती ती अजूनही एमएससीबी कडेच आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुध्दा सदरची जागा ग्रामपंचायतला मिळत नाही.

ती जागा पुन्हा ग्रामपंचायतीच्या मालकीची व्हावी कारण ग्रामपंचायतीला विविध कामांसाठी सदर जागेची गरज आहे. तेव्हा सदरची जागा पुन्हा ग्रामपंचायतीच्या नावे व्हावी यासाठी महसूलमंत्री यांना निवेदन देण्यात आले. अशा विविध मागण्यांचे अनेक वर्षांचे गर्‍हाणे महसूलमंत्री यांच्याकडे मांडण्यात आले.

या मागणीचे निवेदन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, कळसचे ग्रामपंचायत प्रशासक पावसे, काँग्रेसचे युवा सरचिटणीस अरूण वाकचौरे, शिक्षक बँकेचे संचालक आण्णासाहेब ढगे, आनंदराव वाकचौरे, जीआर फाऊंडेशनचे गणेश रेवगडे, रावसाहेब वाकचौरे, सुदाम वाकचौरे, संजय बन्सी वाकचौरे, राहुल शांताराम वाकचौरे, रामकृष्ण वाकचौरे, आण्णासाहेब डुबे, वसंत ढगे, जालिंदर वाकचौरे, संतोष वाकचौरे, प्रविण वाकचौरे, अजित वाकचौरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या