Thursday, April 25, 2024
Homeनगरकळस बुद्रुक येथे वारकरी संप्रदायाचे घंटानाद आंदोलन

कळस बुद्रुक येथे वारकरी संप्रदायाचे घंटानाद आंदोलन

कळस |वार्ताहर| Kalas

अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील भजनी मंडळ व वारकरी ग्रामस्थांच्यावतीने ‘दार उघड’ हा अभंग सादर करून घंटानाद आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात मंदिरांना टाळे आहे. मंदिर बंद असल्याने वारकरी भाविक भक्तांना मंदिरात जाता येत नाही. सध्या सरकारने प्रत्येक गोष्टीत नियमावली जाहीर करून व्यवसाय दुकाने चालू करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच मद्य दुकाने देखील चालू केली मग आध्यात्मिक बाबतीतच हे सरकार दुजाभाव का करत आहे. ज्या वारकरी किंवा भाविकांकडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची ठेच पोहचली नाही त्यांच्या भावनांशी सरकार का खेळतयं? असे विविध प्रश्न समोर ठेवून महाराष्ट्रभर काल घंटानाद आंदोलन करण्यात आले.

सरकारने विचार करून नियमावलीत मंदिर उघडावे. भाविकांच्या भावना समजाव्यात. कारण मंदिर उघडून फक्त भाविकांनाच नाही तर अनेकांना रोजगार देखील उपलब्ध होतील. मंदिर बंद असल्याने त्याठिकाणी छोटासा व्यवसाय करणार्‍या व्यवसायिकांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे.

सरकारने इतर दुकाने उघडून व मंदिर बंद ठेऊन दुजाभाव केला आहे. त्यामुळे आता तरी उध्दवा दार उघड असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे मंदिरे उघडण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सर्वच वारकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या