Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याहसत हसत विनोद केला 'राऊत साहेब तुम्ही सर्वांनाच चंदन लावले'; तितक्यात महंतांनाच...

हसत हसत विनोद केला ‘राऊत साहेब तुम्ही सर्वांनाच चंदन लावले’; तितक्यात महंतांनाच लावले चोरट्यांनी चंदन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आज सकाळी दहा वाजता पंचवटीतील काळाराम मंदिरात (Kalaram Temple Nashik) जाऊन श्रीरामांचे दर्शन घेतले. खासदार राऊत दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी महंत सुधीरदास (Mahant Sudhirdas) यांनी काळाराम मंदिराच्या ऐतिहासिक वास्तूची व संस्थानच्या विविध कार्याची ओळख करून दिली. त्यानंतर सुरुवातीला काळाराम मंदिरातील मारुतीचे दर्शन घेतले व नंतर काळाराम मंदिरात जाऊन संकल्प सोडला व श्रीरामाची आरती केली…

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (दि १६) सकाळी त्यांनी कालारामाचे दर्शन घेतले. यावेळी महंत सुधीरदास यांनी त्यांना मंदिराची संपूर्ण माहिती सांगितली.

यावेळी कपाळाला चंदन लावताना महंत सुधीरदास महाराज यांनी मिश्कीलपणे खा. राऊत यांना, राऊत साहेब, तुम्ही सर्वांनाच चंदन लावले असे म्हणत महाविकास आघाडी स्थापनेच्या निर्णयावर सांगितले.

चंदन लाऊन झाल्यानंतर खा. राऊत यांनी दक्षिणा स्वरुपात काही रोख रक्कम महंत सुधीरदास महाराज यांच्या हातात दिली. यावेळी महंतांचे पैशांचे पाऊच तिथे जवळच ठेवले होते. मात्र, गडबडीत हे पाऊच कुणीतरी लांबवले असे महंतांनी सांगितले.

या पाऊचमध्ये काही रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दक्षिणेचे पैसे गेले याबाबत आपण फक्त मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणार आहोत. कुठलीही तक्रार पोलिसांत करणार नसल्याचे महंत सुधीरदास यांनी स्पष्ट केले.

पुढल्या वेळी मुख्यमंत्र्यांना घेऊन या…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दवाखान्यात दाखल करण्यात आल्यानंतर १० ते १५ नागरीकांनी याठिकाणी अनुष्ठान केल्याचे महंतांनी यावेळी सांगितले. पुढल्या वेळी मुख्यमंत्री नाशकात आले तर जरूर कालारामाच्या दर्शनासाठी त्यांना घेऊन या असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या