Thursday, April 25, 2024
Homeनाशिकगिर गायींची सेवा करणारा अवलिया

गिर गायींची सेवा करणारा अवलिया

नाशिक । प्रतिनिधी

कुठेही भाकड अथवा मोकाट असलेल्या गिर गायींचे संरक्षण करून त्यांचे संगोपन करण्याचे काम कैलास परशरामपुरिया अखंडपणे चालू ठेवले आहे.

- Advertisement -

चांदशी येथे स्वतःच्या मालकीची स्वतंत्र जागा घेऊन या ठिकाणी सेवेचे एक मोठे कार्य हाती घेण्यात आले आहे कुठेही मोकाटच व बेवारस काही आढळल्यास त्यांना आपल्या गोठ्यात आणून त्यांचे संगोपन करण्याचे काम ते करीत आहेत त्यांच्या माध्यमातून आता 60 ते 70 घाई त्यांच्या गोशाळेत आहेत.

या गाईंपासून निघणारे दूध परिसरातील अनाथाश्रम व गरीब मुलांना दिले जाते गायीच्या शेनापासून तयार व्हावे खत हे शेतकऱ्यांना देऊन त्या माध्यमातून गाईच्या जोपासते साठी उपाय योजना केली जाते शाळेतून केवळ सेवा करणे हाच उद्देश समोर ठेवल्याने त्यातून मिळणाऱ्या प्रत्येक उत्पन्नाचा उपयोग त्यांच्या संगोपनासाठी करण्याचा निर्धार कैलाश परशरामपुरिया यांनी केला आहे .

या कार्यात त्यांची दोन्ही मुले पंकज व प्रमोद हे हिरीरीने सहभाग घेत असतात नंतर बांधकाम व्यवसाय असताना या व्यक्तीचा वेळ गो सेवेमध्ये व्यतीत करण्यात संपूर्ण कुटुंब अग्रेसर असतात.

देशी गिर गाईंची नस्लं भारतीय असून तिची जोपासना करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे गो सेवेचे महात्म्य खूप मोठे असल्याने उतारवयात आपण हेच कार्य करणार असल्याचे कैलास परशरामपुरिया यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या