Friday, April 26, 2024
Homeनाशिककादवाच्या ४४ व्या गळीत हंगामास होणार सुरुवात

कादवाच्या ४४ व्या गळीत हंगामास होणार सुरुवात

ओझे | वार्ताहर Oze Dindori

दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील वैभव म्हणून कादवा सहकारी साखर कारखान्याचे नाव संपूर्ण जिल्ह्यात नावारुपाला आलेली आहेत. योग्य नियोजन व संचालक मंडळांची एकसुञी कारभार योजना यामुळे यंदा कारखाना आपल्या यशस्वी ४४ व्या गळीत हंगामाची सुरुवात करीत आहे….

- Advertisement -

तालुक्यातील शेतकरी वर्गाने उस लागवडीला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याने यंदा ही कारखाना आपल्या गळीत हंगामाची यशस्वी सुरुवात करणार आहे.

यंदा केंद्र शासनाने कादवा सहकारी साखर कारखान्याला २५००टन गाळप क्षमतेस मंजुरी दिली असून या वर्षी तेवढ्या ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

२०१९-२० चे गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाची संपूर्ण एफआरपी अदा केली असल्याची माहिती कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली आहे.

गळीत हंगाम २०१९-२० मध्येही कादवाचा साखर उतारा उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक असून यंदाही कादवाची एफआरपी सर्वाधिक राहिल.अशी आशा शेटे यांनी व्यक्त केली आहे.

मागील हंगामात कारखान्याची एफआरपी साधारणपणे २७३३.३७ एवढी होती. यंदा ही सरासरी आम्ही यशस्वी पुर्ण करू कारण तालुक्यातील शेतकरी वर्गाने उस लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

तालुका कृषी विभागाच्या माहिती च्या आधारे तालुक्यात जवळ जवळ २७००हेक्टर च्या आसपास उसाची लागवड झाल्याचे समजते.

यंदा पावसाचे प्रमाण उस पिकांसाठी समतुल्य स्वरूपाचे असल्यामुळे यंदा उस पिकांला वजना संदर्भात व सरासरी पुर्ण करण्यासाठी काही अडचणी निर्माण होणार नाही. असे उस उत्पादकांकडून बोलले जात आहे.

कादवाचा हंगामाची सुरुवात करण्यासाठीची अंतिम तयारी जवळ जवळ पुर्ण झाली असून उस तोड मजुरांची यंदा कमतरता येणार नाही. याकडे यंदा कारखान्याने विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे उस उत्पादक शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

कादवा कडे कार्यक्षेत्रासोबतच निफाड कळवण नाशिक तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ऊस नोंद झालेली असून कादवा ने पुरेसे ऊस तोड कामगार भरती केलेली आहे. कोव्हिड 19 च्या संकटात हा हंगाम पार पाडणे मोठे आव्हान आहे. मात्र, सरकारने दिलेल्या सर्व दिशा निर्देश सूचनांचे पालन करत हंगाम यशस्वी करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

श्रीराम शेटे, चेअरमन कादवा

- Advertisment -

ताज्या बातम्या