Thursday, April 25, 2024
Homeनगरकडगावात साडेतीन लाखाची घरफोडी

कडगावात साडेतीन लाखाची घरफोडी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील कडगाव येथे घराचे कुलूप तोडून घरफोडी करत चोरट्यांनी सुमारे 3 लाख 80 हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.17) भर दिवसा घडली. या प्रकरणी दिनकर रंगनाथ कोरडे यांनी तक्रर दिली आहे. त्यानुसार 17 डिसेंबर रोजी कोरडे पाथर्डी येथे पाहुण्यांच्या लग्नाला गेले होते.

- Advertisement -

तर पत्नी अनिता ह्या शेतात कापुस वेचण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तेे घरी परतले असता घराचे कुलूप तुटलेले दिसले. कपाटातील सामान खाली अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटात पाहिले असता अज्ञात चोरट्यांनी कपाटातील एकूण 3,79,500 सोन्याचा ऐवज लंपास केल्याचे आढळून आले. त्यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध घरफोडीची गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळी उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या