Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशNV Ramana : एन. व्ही. रामन्ना हे देशाचे ४८ वे सरन्यायाधीश

NV Ramana : एन. व्ही. रामन्ना हे देशाचे ४८ वे सरन्यायाधीश

दिल्ली | Delhi

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.

- Advertisement -

पदभार स्विकारताच एन. व्ही. रामन्ना हे देशाचे ४८ वे सरन्यायाधीश ठरणार आहे. सर्वोच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमन्ना हे देशाचे पुढील मुख्य न्यायाधीश अर्थात सरन्यायाधीश असणार आहे.

विद्यमान सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी एन. व्ही. रमन्ना यांच्या नावाची शिफारस सरकारकडे पाठविली. अलीकडेच, सरकारने त्यांना उत्तराधिकारी म्हणून त्याचे नाव पाठविण्यास सांगितले होते.

सरन्यायाधीश एस.ए. बोबडे २३ एप्रिल रोजी आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत. यानंतर एन. व्ही. रमन्ना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत.

राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यालयाकडून आता नियुक्त करण्यात येत असल्याचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

दरम्यान एन. व्ही. रमन्ना हे २४ एप्रिल रोजी शपथ घेतील. २४ एप्रिलला रामण्णा यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली तर त्यानंतर १६ महिने त्यांचा कार्यकाळ असेल.

न्यायमूर्ती एन. व्ही. रमन्ना यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्ण जिल्ह्यातील पोन्नवरम गावात झाला. ते पहिल्यांदा १० फेब्रुवारी १९८३ रोजी वकील झाले. रामना यांची २७ जून २००० रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.

त्यानंतर त्यांनी १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ पर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले. २०१८ मध्ये माजी सरन्याधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील अभियोग, आमदार लाच प्रकरणात राजकारण इत्यादी प्रकरणात रामण्णा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या