Friday, April 26, 2024
Homeनाशिकलाच स्विकारताना कनिष्ठ लिपिक गजाआड; येवला दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार

लाच स्विकारताना कनिष्ठ लिपिक गजाआड; येवला दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

येवला शहरातील (yeola city) दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला चार हजारांची लाच स्विकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau) अटक केली आहे. रणजीत शिवसिंग गुशिंगे (वय ३६) असे या लाचखोर लिपिकाचे नाव आहे….(junior Clark arrested in four thousand bribe case)

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, काल (दि १८) रोजी दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक (Junior Clark) असलेल्या रणजित गुशिंगे याने तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या शेतजमिनीच्या संदर्भात न्यायालयाने दिलेला हुकुमनामा फायलिंग होऊन सूची क्रमांक २ काढून देण्यासाठी

चार हजारांची लाच मागितली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचप्रतिबंधक विभागाकडे या लिपिकाची तक्रार केली.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने (Sunil kadasane sp acb nashik), अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (narayan nyahalade upper sp acb nashik), पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे (satish bhamare dsp acb nashik) यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्यासह पोलीस नाईक अहिरराव, पोलीस नाईक अजय गरुड यांनी सापळा यशस्वी करत

लाचखोर कनिष्ठ लिपिकास गजाआड केले. याप्रकरणी लिपिकास ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या