Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये आयडिया कॉल सेंटरमध्ये जम्बो कोविड सेंटर

औरंगाबादमध्ये आयडिया कॉल सेंटरमध्ये जम्बो कोविड सेंटर

औरंगाबाद – Aurangabad

कोरोना रूग्ण शहरात मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने महापालिकेने दोन जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यापर्यंत आयडिया कॉल सेंटरच्या इमारतीत जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी पालिकेने केली आहे. या ठिकाणी 1100 रुग्णांची व्यवस्था केली जाणार आहे.

- Advertisement -

मागील महिनाभरापासून कोरोना रूग्णांची संख्या गतीने वाढत असल्याने शहरात उपलब्ध बेड्स व आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेवरून जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्याची तयारी सुरू केली आहे. पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आपल्या अधिकार्यांना सोबत घेत काही जागांची पाहणी मागील आठवड्यात पाहणी केली. त्यानंतर आयडिया कॉल सेंटर व मराठवाडा रियलेटर्स कंपनी या दोन ठिकाणी जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. आयडिया कॉल सेंटरमध्ये 1100 तर मराठवाडा रियलेटर्स कंपनीत चारशे अशा एकूण 1500 खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. या दोन्ही पैकी आयडिया कॉल सेंटरमधील कोविड केअर सेंटर पुढील आठवड्यात सुरु होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या