Friday, April 26, 2024
Homeनगरसुवर्णा कोतकर यांच्या जामीन प्रकरणी मंगळवारी निर्णय

सुवर्णा कोतकर यांच्या जामीन प्रकरणी मंगळवारी निर्णय

अहमदनगर|Ahmedagar

केडगाव येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुवर्णा कोतकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर

- Advertisement -

सरकारतर्फे आज म्हणणे मांडण्यात आले. जिल्हा न्यायाधीश यांनी यानंतर निर्णय राखून ठेवला. यावर आता मंगळवारी (दि. १५) निर्णय होणार आहे.

जिल्हा न्यायाधीश अमित शेटे यांच्यासमोर सुवर्णा कोतकर यांच्या अंतिम अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. केदार केसकर यांनी युक्तीवाद केला. सीआयडीचे उपअधीक्षक ए. बी. सपकाळे यावेळी उपस्थित होते. आरोपीतर्फे वकील नितीन गवारे यांनी काल युक्तिवाद केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या